"जेव्हा मी गजर करत असतो, तेव्हा मी स्वतःला पूर्णपणे विसरलेलो असतो... मी फक्त एक माध्यम असतो, बाकी मी काही नसतो." - राहुल देशपांडे
पं. डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. कुमार गंधर्व यांच्या सुरांचा दैवी वारसा अभिमानाने पुढे नेणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांच्याशी मारलेल्या या खास आणि मनमोकळ्या गप्पा!
लोकमत फिल्मीच्या 'No Filter' या विशेष मुलाखतीमध्ये राहुल देशपांडे यांनी त्यांच्या सांगीतिक प्रवासातील अनेक पैलू उलगडले आहेत. लहानपणी किशोरी आमोणकर यांचं गाणं ऐकून लागलेली तंद्री, पं. कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनांचा मनावर झालेला परिणाम आणि आपल्या आजोबांच्या (Pt. Vasantrao Deshpande) सुरांशी असलेली घट्ट नाळ, याबद्दल त्यांनी अत्यंत भावूक आठवणी सांगितल्या आहेत.
स्टेजवर परफॉर्म करताना मिळणाऱ्या १० मिनिटांच्या स्टँडिंग ओव्हेशननंतर (Standing Ovation) डोळे मिटल्यावर समोर काय दिसतं?
'अभंगवारी' (Abhangwari) कार्यक्रमाच्या वेळी निर्माण होणारी भक्तीची ऊर्जा नेमकी काय असते?
आणि एक कलाकार म्हणून आजही त्यांना 'मला काहीच येत नाही' असं का वाटतं?
या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी या संवादात दिली आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला राहुल देशपांडे यांच्या सुमधुर आवाजात 'तुझं मागतो मी आता' आणि 'निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई' हे अप्रतिम गायन ऐकायला विसरू नका!
चॅनलला नक्की Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा!
#RahulDeshpande #classicalmusic #indianclassical #Abhangwari #VasantraoDeshpande #NoFilter #NatyaSangeet #Marathigappa #LokmatFilmy #शास्त्रीयसंगीत #राहुलदेशपांडे